आकर्षक वाहन क्रमांकातून मिळाला वाशिम ‘आरटीओ’ला सात लाखांचा महसूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:33 PM2017-11-16T14:33:26+5:302017-11-16T14:35:33+5:30

वाशिम - गत सात महिन्यांत  आकर्षक वाहन क्रमांकातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास सात लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.  स्वत:च्या आवडी-निवडीपुढे पैसा ही बाब गौण्य ठरते, हे १५८  वाहनधारकांनी दाखवून दिली आहे.

 Washim 'RTO got 7 lakh revenue from attractive vehicle number! | आकर्षक वाहन क्रमांकातून मिळाला वाशिम ‘आरटीओ’ला सात लाखांचा महसूल !

आकर्षक वाहन क्रमांकातून मिळाला वाशिम ‘आरटीओ’ला सात लाखांचा महसूल !

Next
ठळक मुद्दे वाशिम शहरात मनपसंद क्रमांकांची क्रेझ

वाशिम - गत सात महिन्यांत  आकर्षक वाहन क्रमांकातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास सात लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. 
स्वत:च्या आवडी-निवडीपुढे पैसा ही बाब गौण्य ठरते, हे १५८  वाहनधारकांनी दाखवून दिली आहे. स्वत:ची मनपसंद, आवड, इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘पैसा’ मोजण्याची तयारी असणाºयांची संख्या कमी नाही. प्रत्येकच क्षेत्रात ‘आवड व निवडी’ने प्रवेश केल्याने विशिष्ट निवडीला अर्थपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनांना द्यावयाचा परवाना क्रमांकही सुटू शकला नाही.  एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वाहनांच्या या विशिष्ट आकड्यांनी शासनाच्या तिजोरीत सात लाख रुपयांचा महसूल टाकला आहे. पसंतीच्या वाहनांची खरेदी केल्यानंतर या वाहनाला पसंतीचाच क्रमांक मिळविण्यासाठी अनेकजण आपल्यापरीने धडपड करतात. ग्राहकांची ‘पसंती आणि आकड्यांचा लाभदायक खेळ’ पूर्ण करण्याची धडपड पाहून परिवहन विभागाने महसूल वाढीची योजना अंमलात आणली आहे. यानुसार व्हिआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे ‘क्रमांक’ आरक्षित करून त्याला ‘किंमत’ देण्यात आली. एक हा क्रमांक सर्वात महागडा असून तो प्राप्त करण्यासाठी चारचाकी वाहनाच्या मालकांना लाखो रुपये मोजावे लागतात. 

Web Title:  Washim 'RTO got 7 lakh revenue from attractive vehicle number!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.