वाशिम : ग्रामीण भाग कोरोनामुक्त; शहरात केवळ एक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 04:33 PM2021-08-11T16:33:51+5:302021-08-11T16:33:57+5:30
Corona Cases in Washim : गत १३ दिवसांत वाशिम शहरात एक रुग्ण आढळला तर ग्रामीण भगाात एकही रुग्ण आढळला नाही.
वाशिम : आॅगस्ट महिन्यात कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १३ दिवसांत वाशिम शहरात एक रुग्ण आढळला तर ग्रामीण भगाात एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे ग्रामीण भाग तुर्तास तरी कोरोनामुक्त ठरला असून, शहरही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत एप्रिल ते आॅक्टोबर या दरम्यान इतर शहरांच्या तुलनते वाशिम शहरात अधिक संख्येने रुग्ण आढळले होते. दुसºया लाटेत मार्च ते मे २०२१ या कालावधीत वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी अनेकांना वेटींगवर राहण्याची वेळ आली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, आॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. २९ जुलै ते १० आॅगस्ट या १३ दिवसांत वाशिम शहरात केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला. ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आला नाही. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने तालुकावासियांची चिंता बºयाच अंशी कमी होत आहे.
सर्वांच्या सहकार्यातून शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर
प्रशासन, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आदींच्या सहकार्यातून वाशिम तालुक्यातील ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला तर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. कोरोना नियंत्रणात असल्याने निर्बंध आणखी शिथिल झाले आहेत. रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. कोरोनाच्या तिसºया लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे अपेक्षीत आहे. कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांची दुकानदारांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.