वाशिम: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाकरणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:49 PM2018-01-22T13:49:31+5:302018-01-22T13:51:23+5:30
वाशिम: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाज विकासात योगदान देणाऱ्या महिला आणि युवतींचा महात्मा फुले कलारसिक बहुउद्देशिय संस्था, महात्मा ज्योतीबा फुले समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
वाशिम: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाज विकासात योगदान देणाऱ्या महिला आणि युवतींचा महात्मा फुले कलारसिक बहुउद्देशिय संस्था, महात्मा ज्योतीबा फुले समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विठ्ठल रुक्मीणी संस्थान परिसर सोनखास येथे माळी युवा मंचचे अध्यक्ष अशोक राऊत यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी सायंकाळी सावित्रीबाई फुले जयंती पर्वाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते. यावेळी राज्यातील नामवंत कवी, कवीयत्रींचे गित व कवी संमेलनही उत्साहात पार पडले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी होते. उद्घाटक म्हणून रामदास डोंगरे, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे, जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, बी.एच. पवार, सामाजीक कार्यकर्त्या अॅड. भारती सोमाणी, वैभव इंगोलेकर, उज्वल शेंदुरकर, ईश्वर ढगे, राहुल राऊत, जगदीश राऊत, सागर राऊत, प्रा. सपकाळ आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृषाली देवकर परतवाडा, कांचन वीर यवतमाळ, डॉ. सुलभाताई ठक बार्शीटाकळी, अॅड. भारती सोमाणी वाशिम, खोब्रागडे, राणी पवार, अलका गोर्डे, धनगर, संगीता ठग, विद्या पाढेण, सोनू राऊत आदी सावित्रींच्या लेकींचा गौरव करण्यात आला. तदनंतर महाराष्ट्रातील नामवंत कवींनी वºहाडी, हास्य, तसेच शेतकरी आत्महत्या, हागणदारी, कॅशलेश व विविध समस्यांवर प्रबोधन करणाºया दर्जेदार कविता सादर करुन उपस्थितांना जिंकले. त्यामध्ये सुहास देशमुख, डॉ. शाम ठक, अरुण ढोणे, किशोर पवार, सुहास देशमुख आदिंसह कवीयत्रींचा समावेश होता. ग्रामीण व शहरी संस्कृतीचेही यावेळी दर्शन कवितेतून सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अशोक राऊत यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर, महिला व जनतेची उपस्थिती होती.