वाशिमच्या सैनिकी शाळेत हिंदी गीतगायन स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:32 PM2017-12-06T17:32:46+5:302017-12-06T17:33:18+5:30
वाशिम : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विकास व्हावा विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य वाढीस लागावे म्हणून स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या हिंदी समितीव्दारे हिंदीगीत गायनाची स्पर्धा संपन्न झाली.
वाशिम : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विकास व्हावा विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य वाढीस लागावे म्हणून स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या हिंदी समितीव्दारे हिंदीगीत गायनाची स्पर्धा संपन्न झाली.
सदर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य, एम.एम.भोयर, प्रमुख अतिथी कर्नल पी.पी.ठाकरे,कमांडर श्री.एस. बी.चव्हाण, आर.ए.सरनाईक, एस.आर.सातपुते, वि.व्ही. देशमुख , के.व्ही.बोबडे, बि.डी. सोनटक्के, आदी मान्यवरांची मंचकावर उपस्थिती होती.
सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली वर्ग ५ ते ८ अ तथा वर्ग ९ ते १२ ब गट या स्पर्धेमध्ये स्पर्धकाला हिंदी फिल्मी गीत, हिंदी भजन, हिंदी कवने, हिंदी शेभक्तीपर गित, हिंदी कवितास ादर करावयाची होती हिंदी गित गायन स्पर्धेमध्ये अ गट तथा ब गटातून एकूण ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात आले दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय , तथा तृतीय क्रमांक पटकाविणाºया स्पर्धकाला पाहुण्याां हस्ते बक्षीस देण्यात आली गट अ मधून प्रथम वर्ग ८ वा शुभम कोठुळे व्दितीय वर्ग ५ वा. कुमा राम चौधरी तर तृतीय वर्ग ५ वा अक्षय तांबारे यांनी पटकाविला. तर गट ब मधून प्रथम वर्ग १२ वा कुमार राज बवनकर, व्दितीय वर्ग ९ वा मधून कुमार तेजस ठाकरे, अथर्व गावंडे, तृतीय वर्ग ९ वा कुमार राम सावष्ळकर यांनी पटकाविला. सदर स्पर्धेमध्ये जज म्हणून वर्षा वाजपयी डी.पी.पाटील, एस.एस.मोळके यांनी काम पाहीले.सदर स्पर्धेचे आयोजन व नियोजन हिंदी समितीचे एम.पी.राउत, आर.आर. पडवाळ , पी.ए.पाचकोर, एस.एस. राउत,, एम.एन. ढोबळे, एस.बी. कºहाळे, पी.पी. पोळकटयांनी उत्कृष्ट गित गायन स्पर्धेचे आयोजन करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
स्पर्धेचे सुत्रसंचालन वर्ग ९ वी तील अभिषेक पावसे तथा श्याम पवार यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षीका तथा शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती.