वाशिम: दुचाकी अपघातात एक गंभीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:43 AM2018-03-06T01:43:00+5:302018-03-06T01:43:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : वाशिमवरून शेलुखडसे (ता.रिसोड) या गावी जात असलेल्या दुचाकीला काळवीट आडवे आल्याने घडलेल्या अपघातात वाहनावरील दोघांपैकी एकाच्या मेंदूला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना हराळ फाट्यानजिक ५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वाशिमला कामानिमित्त दुचाकीने (क्रमांक एम एच ३७/ ६११७) गेलेले विनोद उद्धव मोरे आणि ज्ञानेश्वर जानकीराम खडसे हे दोन युवक सायंकाळी गावी परतत होते. यादरम्यान हराळ फाट्यानजिक रस्ता ओलांडणारे काळवीट दुचाकीच्या आडवे आल्याने अपघात घडला. यात विनोद मोरे याच्या मेंदूला जबर मार लागला; तर ज्ञानेश्वर खडसे हा किरकोळ जखमी झाला. दरम्यान, रिसोड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून गंभीर जखमी असलेल्या विनोद मोरे याची पुढील उपचाराकरिता अकोला येथील रुग्णालयाकडे रवानगी करण्यात आली.
खेर्डा फाट्यानजीक
दुचाकी अपघात
कारंजा लाड : समोरून भरधाव वेगात येणाºया प्रवासी आॅटोने कावा मारल्यामुळे दुचाकीवरून पडून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील खेर्डा फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर घडली. प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथील शकुंतला महल्ले (वय ६८ वर्षे) आणि त्यांचा मुलगा गजानन हे दोघे दुचाकीने हिरपूर येथे जात होते. दरम्यान, कारंजा-मूर्तिजापूर मार्गावर समोरून येणाºया प्रवासी आॅटोने दुचाकीला कावा मारल्याने आई व मुलगा दोघेही खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला जबर दुखापत झाली. कारंजा येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांची अकोला येथील रुग्णालयात रवानगी करण्यात आली.