कमी उत्पन्नामुळे वाशिम-शिरपूर बसफेऱ्या बंद; प्रवाशांची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:33 PM2019-04-01T17:33:35+5:302019-04-01T17:33:57+5:30
मानोरा (वाशिम) : तालुक्यातून वाहणाºया अरुणावती नदीचे शहरालगतचे पात्र महिनाभरापासून कोरडे पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): वाशिम येथील आगाराकडून शिरपूर-वाशिम मार्गावर धावणाºया बसफेºया बंद केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील विविध गावातून वाशिम, शिरपूरकडे प्रवास करणाºया शेकडो प्रवाशांची पंचाईत झाली आहे. बसफेºयांचे उत्पन्न घटल्यामुळे त्या बंद करण्यात आल्याचे या संदर्भात घेतलेल्या माहितीवरून कळले असून,यामुळे खासगी
अवैध वाहतुकीला चांगलेच बळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
वाशिम शहर हे जिल्ह्याचे ठिकाणी असून, या ठिकाणी असलेल्या जिल्हा कार्यालयांसह विविध कामांसाठी जिल्ह्यातील सर्वच गावांतून हजारो लोक दरदिवशी येतात. यात शिरपूरसह परिसरातील शेकडो ग्रामस्थांचाही समावेश आहे. या ग्रामस्थांना प्रवासाची सुविधा म्हणून वाशिम आगाराच्या काही बसफेºया नियमित धावत होत्या; परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिम मार्गावर तामसी येथे रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर या बसफे ºया बंद करण्यात आल्या. त्या बसफेºया आता कमी उत्पन्नाच्या कारणावरून कायमच बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर विविध ठिकाणी प्रवास करणाºया शेकडो प्रवाशांची पंचाईत झाली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असलेल्या महामंडळाच्या बसफेºया केवळ उत्पन्नाच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या प्रवासीवर्गातून रोष व्यक्त होत असून, याचा फायदा खासगी अवैध वाहतुकीला होत आहे. आता बसफेºया बंद झाल्याने शिरपूर व परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा शिरपूर येथील ग्रामस्थांना वाशिम येथे येण्यासाठी मालेगावला जावे लागते आणि तेथून बसने वाशिम येथे यावे लागते. याचा आर्थिक भुर्दंड त्यांना बसत असून, वेळही अधिक लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वाशिम आगाराने बंद केलेल्या सकाळ, दुपार, संध्याकाळच्या तीन बसफेºया पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी शिरपूर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
मागील कित्येक महिन्यापासून वाशिम आगाराने शिरपूर-वाशिम फेºया बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेळेचा व पैशाचा अधिक फटका बसत आहे. वाशिम आगाराने लग्नसराई लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणे किमान तीन फेºया तरी पूर्ववत कराव्या.
-केशवराव देशमुख
शिरपूर जैन
वाशिम-शिरपूर मार्गावर धावणाºया बसफेºयांचे उत्पन्न कमी असल्याने नालईलाजास्तव त्या बसफेºया बंद कराव्या लागल्या. या संदर्भात प्रवाशांची मागणी असेल, तर त्यांनी रितसर अर्ज करावा आम्ही तो विभागीय नियंत्रकांकडे सादर करू. त्यांच्या परवानगीनंतरच बसफेºया सुरू करण्याबाबत निर्णय घेता येईल.
- राजेंद्र इलमे
आगार व्यवस्थापक वाशिम