वाशिम : पतीच्या खून प्रकरणी पत्नीस सहा वर्षाचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 08:22 PM2017-12-14T20:22:31+5:302017-12-14T20:23:45+5:30
दारु पिऊन बायको सोबत कडाक्याच्या झालेल्या भांडणात मृत्युमखी पडलेल्या नागो उकंडी भगत यांच्या खुन प्रकरणी पत्नी तानाबाई नागो भगत या महिलेला सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अभय मंत्री यांनी १४ डिसेंबर रोजी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दारु पिऊन बायको सोबत कडाक्याच्या झालेल्या भांडणात मृत्युमखी पडलेल्या नागो उकंडी भगत यांच्या खुन प्रकरणी पत्नी तानाबाई नागो भगत या महिलेला सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अभय मंत्री यांनी १४ डिसेंबर रोजी सुनावली. सदर हत्याकांड पंचशिल नगर परिसरातील घरकुल येथे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडले होते.
शहरातील पंचशिल नगर येथे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी पती नागो भगत रात्री ८ वाजता दारु पिऊन घरी आल्यानंतर बायको, तानाबाई सोबत भांडू लागला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु असतांना पत्नी तानाबाई हिने पती नागो यास खाली पाडून मारहाण करुन गळा दाबुन जिवाने मारुन टाकले अशी फिर्याद मृतक नागो यांचे वडील उकंडी भगत यांनी शहर पोलिस स्टेशनला तब्बल १५ दिवस उशिरा २१ नोव्हेंबर २०१५ रोजी दिली. सदर प्रकरणी पोलिसांनी प्रथम मर्ग दाखल केला होता व नंतर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन तपासानंतर प्रकरण न्याय प्रविष्ठ केले होते. या प्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंत्री यांनी आरोपी पत्नी तानाबाई भगत हिस कलम ३०४मध्ये सहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पाचशे रुपये दंड ,दंड न भरल्यास पुन्हा एक महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे यांनी बाजु मांडली.