Washim: ‘सलोखा’ योजनेतून कुटे कुटंबाला ‘दिलासा’
By संतोष वानखडे | Published: April 27, 2023 01:45 PM2023-04-27T13:45:32+5:302023-04-27T13:46:29+5:30
Washim: सलोखा योजनेचा पहिला लाभ वाशिम तालुक्यातील कार्ली येथील कुटे कुटुंबाला मिळाला असून, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांच्या हस्ते दुय्यम निबंधक( मुद्रांक) यांच्याकडील गट अदलाबदलीचे नोंदणीकृत शेतीशी संबंधित असलेली कागदपत्रे कुटे कुटुंबातील खातेदारांना देण्यात आली.
- संतोष वानखडे
वाशिम - सलोखा योजनेचा पहिला लाभ वाशिम तालुक्यातील कार्ली येथील कुटे कुटुंबाला मिळाला असून, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांच्या हस्ते दुय्यम निबंधक( मुद्रांक) यांच्याकडील गट अदलाबदलीचे नोंदणीकृत शेतीशी संबंधित असलेली कागदपत्रे कुटे कुटुंबातील खातेदारांना देण्यात आली.
शेत जमिनीच्या ताब्यावरून आणि वहीवाटीवरून शेतकऱ्यांचा आपसी वाद मिटवून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी सलोखा योजना राबविण्यात येत आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी नाममात्र मुद्रांक शुल्क आणि नाममात्र नोंदणी शुल्क आकारले जाते.
कार्ली येथील चंद्रप्रकाश कुटे कुटुंबातील खातेदाराचा ताबा एका गटात, पण खातेदाराचे नाव दुसऱ्या गटात गेले होते. त्यामुळे खातेदाराचा मूळ गट बदलला होता. सलोखा योजनेमुळे खातेदारांचे नाव मूळ गटात करून देण्यात आले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांच्या हस्ते चंद्रप्रकाश कुटे, सुनंदा कुटे, गोपाल कुटे व नारायण कुटे यांना नोंदणीकृत शेतीशी संबंधित असलेली कागदपत्रे देण्यात आली. यावेळी वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार गजेंद्र मालठाणे व कार्लीचे तलाठी राठोड उपस्थित होते.