वाशिम : ग्रामपंचायतचे कुलूप तोडून घेतली विशेष सभा; पार्डीतिखे येथील प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 07:31 PM2018-02-04T19:31:39+5:302018-02-04T19:36:51+5:30

वाशिम - पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतच्या विशेष सभेसाठी ग्राम पंचायत कार्यालयाचे कुलूप शिपायाने उघडले नसल्याचे पाहून सरपंच व ग्रामसेवकांनी सदस्य, पोलीस पाटलांच्या समक्ष कुलूप तोडून ३ फेब्रुवारीला विशेष सभा घेतली. 

Washim: A special meeting was held by the parditikhe Gram Panchayat; after broken the lock! | वाशिम : ग्रामपंचायतचे कुलूप तोडून घेतली विशेष सभा; पार्डीतिखे येथील प्रकार!

वाशिम : ग्रामपंचायतचे कुलूप तोडून घेतली विशेष सभा; पार्डीतिखे येथील प्रकार!

Next
ठळक मुद्देसभेची पूर्वसूचना दिल्यानंतरही शिपायाने केली दिरंगाईमहिला सदस्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने उडाला सभेत गोंधळकेवळ सरपंच व काही सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली सभा; शासकीय योजनांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतच्या विशेष सभेसाठी ग्राम पंचायत कार्यालयाचे कुलूप शिपायाने उघडले नसल्याचे पाहून सरपंच व ग्रामसेवकांनी सदस्य, पोलीस पाटलांच्या समक्ष कुलूप तोडून ३ फेब्रुवारीला विशेष सभा घेतली. 
३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता पार्डी तिखे ग्रामपंचायतची विशेष सभा असल्याची पूर्वसूचना ग्रामसेवक एस. के. काठोळे यांनी २५ जानेवारी रोजी दिली होती. त्या अनुषंगाने ३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता सरपंच शेषराव दगडूजी अंभोरे, ग्रामसेवक काठोळे, सदस्य, सदस्यांचे प्रतिनिधी सकाळी १०.३०  वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आले असता, शिपायाने कुलूप उघडले नसल्याचे आढळून आले. पोलीस पाटील आर.के. तिखे, सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांच्या उपस्थितीत कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर विशेष सभेला सुरूवातीला झाली. या सभेत काही महिला सदस्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्यासाठी आले असता, सरपंच व ग्रामसेवकांनी या प्रतिनिधींना विनंती करून विशेष सभेला केवळ सदस्यांनाच पाठवावे, असे सांगितले. यावरून काही वेळ गोंधळ झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सरपंच शेषराव अंभोरे, उपसरपंच पदमाबाई अंभोरे, ग्रामसेवक एस.के. काठोळे व काही सदस्यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. घरकुल योजना, १४ वा वित्त आयोगाचा निधी, शासनाच्या विविध योजना यासह गावविकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

 

Web Title: Washim: A special meeting was held by the parditikhe Gram Panchayat; after broken the lock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.