वाशिम : शिक्षकाकडून वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षण क्षेत्रात खळबळ

By संतोष वानखडे | Published: April 19, 2023 05:24 PM2023-04-19T17:24:04+5:302023-04-19T17:24:38+5:30

पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

Washim Teacher molesting student in class stir in education sector | वाशिम : शिक्षकाकडून वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षण क्षेत्रात खळबळ

वाशिम : शिक्षकाकडून वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षण क्षेत्रात खळबळ

googlenewsNext

वाशिम (संतोष वानखडे) : रिसोड शहरातील एका नामांकित शाळेत स्वतःच्या वर्गात शिकत असलेल्या एका ११ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची संतापजनक व शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली. पीडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा आरोपी शिक्षक ए.बी. देशमुख यांच्यावर भादंवी कलम ३५४, पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते गुरू-शिष्यासारखे असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला चांगली दिशा देण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. अलिकडच्या काळात शिक्षक-विद्यार्थी या नात्याला काळीमा फासण्याच्या घटना राज्यात काही ठिकाणी घडत असल्याचे समोर येत आहे. रिसोड शहरातील एका नामांकित शाळेतही शिक्षकाने स्वत:च्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पीडीतेच्या वडिलांनी रिसोड पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांची मुलगी रिसोड शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. शिक्षकाने तिला १८ एप्रिल रोजी शाळेत कविता म्हणण्यास सांगितले. कविता म्हणत असताना शिक्षक ए.बी. देशमुख यांनी तिचा विनयभंग केला. घडलेल्या या प्रकाराने भयभीत झालेल्या पीडितेने हा प्रकार आपल्या आईला रडत रडत सांगितला. या शिक्षकाने यापूर्वीही चार-पाच वेळा असे कृत्य केले असल्याचेही पीडीतेने आपल्या आईजवळ कथन केले. घडलेला सर्व प्रकार ऐकत असताना आई वडिलांचा पारा चढला व त्यांनी थेट रिसोड पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शहरासह तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, अटकही करण्यात आली.  या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई करित आहेत.

Web Title: Washim Teacher molesting student in class stir in education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.