वाशिम : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक धडकले जिल्हा परिषदेत !
By संतोष वानखडे | Published: April 3, 2023 04:33 PM2023-04-03T16:33:10+5:302023-04-03T16:33:21+5:30
शिक्षक नेत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांच्याशी चर्चा केली.
वाशिम : प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने वाशिम जि. प. प्राथ शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ३ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याशी चर्चा केली. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय शिक्षक, मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या करण्यात याव्या, वैद्यकीय देयकाची प्रतिपूर्ती, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीचे एरियस, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित हप्ता, वाशिम पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक देणे आदी विषयांवर शिक्षक नेत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांच्याशी चर्चा केली.
पदोन्नतीचा प्रश्न दोन आठवड्यात निकाली काढण्याचे आश्वासन मिळाले तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती व वरीष्ठ श्रेणी, निवड श्रेणीच्या एरियसबाबत निधीची कमतरता असून, शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सीइओ पंत यांनी सांगितले. भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या अंतिम टप्प्यात असून पुढील आठवडय़ात मिळतील, असेही सांगण्यात आले.