वातावरणात गारवा; वाशिमचे तापमान ८.२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:26 PM2019-01-30T15:26:42+5:302019-01-30T15:26:49+5:30

वाशिम : जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले.

Washim temperature at 8.2 degrees | वातावरणात गारवा; वाशिमचे तापमान ८.२ अंशावर

वातावरणात गारवा; वाशिमचे तापमान ८.२ अंशावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. वातावरणातील बदलाचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्यासह पिकांवरही होत आहे.
गत तीन, चार दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे हवेत गारवा भरला आहे. थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्याने डिसेंबर महिन्यात वाशिम जिल्हाही मोठ्या प्रमाणात गारठला होता. यामुळे तापमान तब्बल ७.५ अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून गारवा कमी होत तापमान १५ अंश सेल्सियसपेक्षाही वर गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरणात अचानक बदल होत असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. थंडीत अशीच वाढ होत राहिल्यास हरभरा पिकांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे. तसेच भाजीपाला, फळबागा, आंबा मोहरावरदेखील प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असल्याने, थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप आदी स्वरूपातील आजार जडत असल्याचे दिसून येते.

Web Title: Washim temperature at 8.2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.