दोन दिवसात ६.२ अंशाने घसरला वाशिमचा पारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:06 PM2019-01-08T14:06:21+5:302019-01-08T14:06:43+5:30

दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला असून मंगळवार, ८ जानेवारीला किमान तापमान केवळ ९ अंश सेल्सियस नोंदविल्या गेले.

Washim temperature down by 6.2 pc in two days | दोन दिवसात ६.२ अंशाने घसरला वाशिमचा पारा!

दोन दिवसात ६.२ अंशाने घसरला वाशिमचा पारा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या हिवाळ्यात ७.८ अशा निच्चांकी पातळीपर्यंत घसरलेल्या वाशिमच्या किमान तापमानात मध्यंतरी १५.२ अंशांपर्यंत वाढ झाली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला असून मंगळवार, ८ जानेवारीला किमान तापमान केवळ ९ अंश सेल्सियस नोंदविल्या गेले. दरम्यान, वातावरणात अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यापासूनच वाशिम जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी होत तापमान जाणवायला लागले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. सकाळीच नव्हे; तर दिवसभर हुडहुडी कायम असून, रात्रीच्या वेळी थंडीचा जोर वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या थंडीमुळे तूर आणि हळद या पिकांना जबर फटका बसला असून गहू आणि हरभरा या पिकांना मात्र हे वातावरण अनुकूल ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, गळा खवखवणे आदी आजारही जडत असल्याचे दिसून येत असून दमा आजारातील रुग्णांचा त्रास बळावल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे.

Web Title: Washim temperature down by 6.2 pc in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.