वाशिम : माकडाला जीवे मारणारे तीन आरोपी वन विभागाच्या ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:10 AM2017-12-18T01:10:23+5:302017-12-18T01:12:51+5:30

रिसोड: तालुक्यातील कुर्‍हा मांडवा येथे एका जखमी अवस्थेतील माकडाला जीवानिशी मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा करणार्‍या पवन कडूजी बांगर या आरोपीसह इतर दोघांना वन विभागाने रविवारी ताब्यात घेतले आहे. 

Washim: Three accused executing Machada forest department is under custody! | वाशिम : माकडाला जीवे मारणारे तीन आरोपी वन विभागाच्या ताब्यात!

वाशिम : माकडाला जीवे मारणारे तीन आरोपी वन विभागाच्या ताब्यात!

googlenewsNext
ठळक मुद्देवन विभागाची कारवाई: कुर्‍हा मांडवा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: तालुक्यातील कुर्‍हा मांडवा येथे एका जखमी अवस्थेतील माकडाला जीवानिशी मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा करणार्‍या पवन कडूजी बांगर या आरोपीसह इतर दोघांना वन विभागाने रविवारी ताब्यात घेतले आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, की पवन बांगर नामक युवकाने एका जखमी अवस्थेतील माकडाला आधी काठीने बेदम मारहाण केली. त्यात माकडाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने माकडास झाडावर उलटे लटकवूनही त्याच्या मृतदेहाला चक्क थापडा आणि जोड्याने मारले. दरम्यान, या संतापजनक प्रकाराची चित्रफीत (व्हिडिओ) शनिवारी दिवसभर अनेक व्हॉट्स अँप ग्रुपवर हवेसारखा पसरला. हा व्हिडिओ पाहणार्‍या समाजातील प्रत्येक नागरिकाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेची माहिती मिळताच रिसोड वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहायक मोहन भोसले यांनी आपली चमू घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. 
याप्रकरणी ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून संबंधित घृणास्पद प्रकार उजेडात आणला. त्याची दखल घेऊन वन विभागानेही तपासाची सूत्रे गतीने फिरवत पवन बांगर या आरोपीसह पवन राठोड आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. संबंधितांना सोमवारी पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

Web Title: Washim: Three accused executing Machada forest department is under custody!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.