वाशिम : मद्यपी एसटी बस चालकामुळे प्रवाशांचा तीन तास खोळंबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 07:07 PM2018-02-04T19:07:56+5:302018-02-04T19:19:49+5:30
शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून लोणारसाठी निघालेल्या एस.टी. बस चालकाने मध्येच मद्य प्राशन केल्याने तो बेधुंद झाला. यामुळे एस.टी. थांबवून चालकाने तब्बल तीन तास आराम केल्याने प्रवाशांची मात्र चांगलीच धांदल उडाली. हा प्रकार ४ फेब्रुवारीला शेलुबाजारपासून २ किलोमिटर अंतरावरील रस्त्यावर घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क

एम.एच.१४ बी.टी. ४८२२ या क्रमांकाची एस.टी. बस नागपूरवरून लोणारसाठी निघाली. दुपारी ४.३० च्या सुमारास ही बस शेलुबाजारवरून पुढे गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने ‘ब्रेक’ मारून गाडी रस्त्यात थांबविली आणि तो ‘स्टेअरिंग’वरच झोपी गेला. सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास तो भानावर आल्यानंतर एस.टी. पुढे सरकू शकली. या प्रकारामुळे मात्र एस.टी.मधून प्रवास करणा-या ८ प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आले.