वाशिम : वारकर्‍यांच्या मृत्यूने गहिवरले उमरा कापसे गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:29 AM2018-02-06T01:29:39+5:302018-02-06T01:31:45+5:30

वाशिम: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त तालुक्यातील उमरा कापसे येथून शेगावला गेलेल्या वारीतील वाहनाला ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक ट्रकने धडक दिली. यात चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यात जवळा येथील एकासह उमरा कापसे येथील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही गावांवर दु:खाची छाया पसरली असून, चार वारकर्‍यांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ गहिवरून गेले आहेत.  

Washim: Umra Kapase village graced by the death of Warakaris! | वाशिम : वारकर्‍यांच्या मृत्यूने गहिवरले उमरा कापसे गाव!

वाशिम : वारकर्‍यांच्या मृत्यूने गहिवरले उमरा कापसे गाव!

Next
ठळक मुद्देअपघाताची वार्ता कळताच गावात पसरली शोककळा शेगावला निघालेल्या वारकर्‍यांच्या वाहनास ट्रकची धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त तालुक्यातील उमरा कापसे येथून शेगावला गेलेल्या वारीतील वाहनाला ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक ट्रकने धडक दिली. यात चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यात जवळा येथील एकासह उमरा कापसे येथील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही गावांवर दु:खाची छाया पसरली असून, चार वारकर्‍यांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ गहिवरून गेले आहेत.  
उमरा कापसे या गावातून गेल्या २१ वर्षांपासून श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त पायदळ दिंडी सोहळा काढण्यात येतो. यंदा या सोहळय़ात परिसरातील चार ते पाच गावातील १७0 हून अधिक वारकरी सहभागी झाले होते. ही वारी ५ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक पोहोचली असता, वारीसोबत असलेल्या तीनचाकी वाहनास मागून येणार्‍या ट्रकने जबर धडक दिली. यावेळी ट्रक उलटून त्यात असलेले सरकीचे पोते अंगावर पडल्याने चार भाविक ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये काशिनाथ चंद्रभान कापसे (६५), रमेश धनाजी कापसे (३५), लिलाबाई बळीराम कापसे (५८) सर्व रा. उमरा आणि रामजी नामदेव काकडे (५0) रा. जवळा, यांचा समावेश आहे. जखमींमध्ये बळीराम रामजी कापसे (६५), किसनाबाई साबळे (५५) आणि सारजाबाई काशिनाथ कापसे (५८), या तिघांचा समावेश आहे. यातील बळीराम कापसे व किसनाबाई कापसे यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवळा आणि उमरा कापसे या दोन्ही गावांमधील ग्रामस्थ अक्षरश: गहिवरून गेले. तथापि, मृतकांच्या कुटुंबाला माहिती देण्याचे ग्रामस्थांनी कटाक्षाने टाळले. गत २१ वर्षांपासून दरवर्षी निघणार्‍या वारीतील चौघांचा मृत्यू झाल्याचे दु:ख ग्रामस्थांना अनावर झाले होते.

अपघातात दोन चिमुकल्यांचे हरविले पित्रुछत्र!
उमरा कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या वारीतील वाहनाचा अपघात होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये रमेश कापसे यांचाही समावेश आहे. रमेश हे अल्पभूधारक शेतकरी आणि ऑटोरिक्षा चालक असून, त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक १४ वर्षांची मुलगी (वैष्णवी) आणि एक ८ वर्षांचा मुलगा आहे. या अपघातामुळे रमेशच्या दोन्ही मुलांचे पित्रुछत्र हरविल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या वारीत रमेश कापसे यांच्यासोबत त्यांची मुलगी वैष्णवीसुद्धा सहभागी झाली होती. त्यामुळे पित्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तिच्या डोळय़ादेखतच घडली. दरम्यान, याच अपघातात मृत्युमुखी पडलेले रामजी काकडे यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एक मुलगा अविवाहित असून, घरातील कर्त्या पुरुषाचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

रमेश अन् रामजींची पहिलीच वारी ठरली शेवटची!
उमरा कापसे येथून गेल्या २१ वर्षांपासून गजानन महाराज प्रकट दिन सोहळय़ासाठी जाणार्‍या पालखी सोहळय़ात परिसरातील शेकडो भाविक उत्साहाने सहभागी होतात. त्यामध्ये उमरा येथून १00 च्यावर, तर जवळा येथूनही दरवर्षी चार ते पाच भाविक सहभागी होत असतात. यंदा या पालखी सोहळय़ात पहिल्यांदाच उमरा येथील रमेश धनाजी कापसे आणि जवळा येथील रामजी काकडे यांनी सहभाग घेतला. संत गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे, ही त्यांची इच्छा; पण संबंधित दोघांवरही त्यापूर्वीच काळाने झडप घातल्याने दोघांचीही ही पहिली वारी शेवटची ठरली. 

उमरा कापसे येथे शांतता!
बाळापूर-पातूर मार्गावर ५ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडलेल्या या अपघाताच्या घटनेची वार्ता कळताच ‘लोकमत’च्या चमूने उमरा कापसे गाव गाठून परिस्थिती जाणून घेतली. यादरम्यान गावातील अनेक जण घटनास्थळ गाठण्यासाठी तत्काळ रवाना झाल्याचे तद्वतच गावातील इतर मंडळींनी एकत्र येत मृत्युमुखी पडलेल्या वारकर्‍यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळू नये, याची बहुतांशी दक्षता घेतल्याचे जाणवून आले. 

Web Title: Washim: Umra Kapase village graced by the death of Warakaris!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.