वाशिम : वत्सगुल्म महोत्सवात शिवकालीन शस्त्रे, पुरातन वस्तूंचे प्रदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 09:28 PM2018-04-13T21:28:48+5:302018-04-13T21:28:48+5:30
वाशिम: जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत ‘वत्सगुल्म महोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १५ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत तीनही दिवस शिवकालीन शस्त्रे व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. त्याशिवाय स्थानिक कलाकारांसाठी नृत्य, गायन स्पर्धाही होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

शालेय मुलांचे ऐतिहासिक ज्ञान वाढविणे, त्यांच्यामध्ये इतिहासाबद्दल अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामाध्यमातून वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्रे, पुरातन वस्तू पाहण्याची संधी मिळणार आहे. वत्सगुल्म महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी १६ एप्रिलरोजी दुपारी ३ वाजता ‘व्हाईस आॅफ वाशिम’ ही गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रुप डान्स स्पधेर्साठी अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच सोलो डान्स स्पधेर्साठी प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासही ३ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.