वाशिम : वाहतूक नियमांना ठेंगा; ७०० जणांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 03:11 PM2021-07-04T15:11:19+5:302021-07-04T15:13:17+5:30
Washim News: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रक ७०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाशिम : वाहतुकीचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करणाºया वाहनधारकांविरूद्ध मालेगाव वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली असून, जून महिन्यात ७०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालविताना मास्कचा वापर करावा, तिबल सीट प्रवास करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. अनेकजण विनाकारण वाहन चालवितात तसेच वाहतूक नियम पाळत नाहीत. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाहतूक नियम न पाळणाºयांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मालेगाव वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियम न पाळणाºयांविरूद्ध कारवाई केली जात आहे. विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट, परवाना नसणे, मास्क नसणे, तिबल सीट आदी कारणांवरून जून महिन्यात ७०० वाहनधारकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या नेतृत्वात जमादार पंजाबराव पवार, पोलीस कर्मचारी मनोहर वानखडे यांनी पार पाडली. वाहनचालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, अशा सूचना वाहतूक शाखेने दिल्या.
मास्क नसल्याप्रकरणी दीड लाखाचा दंड
जून महिन्यात मालेगाव वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम न पाळणाºया ७०० जणांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ३०० जणांनी मास्कचा वापर न केल्याप्रकरणी दीड लाखांचा दंड ठोठावण्यात आला. उर्वरीत कारवायांमध्ये तिबल सीट, परवाना नसणे, फॅन्सी नंबर, कागदपत्रे सोबत नसणे, अवजड वाहतूक आदींचा समावेश आहे.