वाशिम : प्राथमिक शाळांना संच मान्यतेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:00 AM2018-01-11T01:00:58+5:302018-01-11T01:01:36+5:30
वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या यासंदर्भातील संदेश ‘व्हायरल’ झाला. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या यासंदर्भातील संदेश ‘व्हायरल’ झाला. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे व संच मान्यतेचे सुधारित निकष ८ जानेवारी २0१६ च्या शासन निर्णयाने स्पष्ट केले आहेत. शैक्षणिक संस्थांमधील कामांचा दर्जा राखला जावा व कार्यसिद्धी होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी संख्या व भौतिक सुविधांनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या निश्चित केली जाते. ही संख्या निश्चित करण्याच्या प्रक्रियेला ‘संच मान्यता’ म्हटले जाते. शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयांपैकी शिकविले जाणारे अनिवार्य विषय व ऐच्छिक विषय यानुसार शिक्षक नियुक्त केले जातात. शाळांमधील विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा आदींच्या अनुषंगाने दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने संच मान्यतेची प्रक्रिया राबविली जाते. सन २0१७-१८ या वर्षातील संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही, असे वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तथापि, ‘व्हॉट्स अँप’सारख्या सोशल मीडियावर संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संख्येसंदर्भात एक संदेश ‘व्हायरल’ झाला आहे. या संदेशानुसार, राज्यात ४0९२ शिक्षक अतिरिक्त ठरले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ३0८ शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे म्हटले आहे. वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या ‘व्हॉट्स अप’ ग्रुपवरही हा संदेश फिरत असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांना विचारले असता, सन २0१७-१८ या वर्षातील संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती निश्चित नाही. या संदेशासंदर्भात शिक्षण विभागाकडून अद्याप कोणत्याही सूचना नाही. कदाचित हा संदेश ‘फेक’ असू शकतो, असे मानकर यांनी स्पष्ट केले.