Washim: रानडुकराचा हल्ला; शेतमजूर महिला गंभीर जखमी
By सुनील काकडे | Published: October 6, 2023 08:14 PM2023-10-06T20:14:05+5:302023-10-06T20:16:51+5:30
Washim: शेतात सोयाबीन पिकातील कचरा साफ करित असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने गुंफाबाई मधुकर काकडे (३८) ही महिला गंभीर जखमी झाली.
- सुनील काकडे
वाशिम : शेतात सोयाबीन पिकातील कचरा साफ करित असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने गुंफाबाई मधुकर काकडे (३८) ही महिला गंभीर जखमी झाली. जिल्ह्यातील नारेगाव (ता.कारंजा) शेतशिवारात घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुंफाबाई काकडे ही महिला नित्यनेमाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास दुसऱ्याच्या शेतात सोयाबीनमधील कचरा साफ करण्याच्या कामावर गेली होती. काम करित असताना अचानक रानडुकराने तिच्यावर जबर हल्ला चढविला. त्यातून तीने स्वत:ला कसेबसे वाचविले; मात्र या घटनेत गुंफाबाई गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांनी त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेमुळे नारेगाव शेतशिवारातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.