राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:45 PM2018-12-08T13:45:35+5:302018-12-08T13:48:13+5:30
मुलांच्या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघाने अंतिम सामन्यात जळगाव संघावर एकतर्फी मात करून विजेते पद पटकावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ४ ते ६ डिसेंबरदरम्यान मुलांची ३३ वी, तर मुलींची २९ वी राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा खेळविण्यात आली. यातील मुलांच्या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघाने अंतिम सामन्यात जळगाव संघावर एकतर्फी मात करून विजेते पद पटकावले.
मुलांच्या राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात वाशिम संघाने चंद्रपूरच्या संघावर २-० अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात वाशिम संघाने जळगावच्या संघावर एकतर्फी मात करून विजेतेपद पटकावले. वाशिम जिल्हा संघात महेश ठाकरे (कर्णधार), पवन जयस्वाल (उपकर्णधार), अजित बुरे, प्रतिक गवई, सौरभ ताजने, ऋषीकेश देशमुख, कवीश्वर भोयर, सुमित मुंधरे, दिपक लोखंडे, अभिषेक शिरसाट, सागर गुल्हाने, उन्मेष शिंदे या खेळाडूंसह जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने व जय गजानन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय मिसाळ यांचा समावेश होता. विजयी संघाला महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दिपक कवीश्वर, डॉ. संजय कुटे, डॉ. अमर चकोले यांचे मार्गदर्शन लाभले.