वाशिममध्ये दारुबंदीविरोधात महिलांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 01:49 PM2018-05-07T13:49:42+5:302018-05-07T13:49:42+5:30
ग्राम कार्ली येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्री संदर्भात गावातील महिला बचत गटाने एल्गार पुकारला आहे.
वाशिम : ग्राम कार्ली येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्री संदर्भात गावातील महिला बचत गटाने एल्गार पुकारला आहे. गावात दारुबंदी त्वरित करण्यात यावे , अशी मागणी विविध महिला बचत गटाच्यावतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे करण्यात आली आहे. कार्ली या गावाची एकूण लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे. अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने संसार करत आहेत. परंतु येथे अवैध दारु विक्री होत असल्यानं गावातील सुज्ञ नागरिकांच्या विरोधामुळे पोलिसांनी कठोर कार्यवाही करुन अवैध गावठी दारु विक्री बंद केली, परंतु मागील चार ते पाच वर्षांपासून गावठी दारूऐवजी अवैध बेकायदेशीररित्या देशी दारु विकण्याचा गोरखधंदा गावातील काही व्यक्तींकडून सर्रासपणे होत आहे.
गावात दारु विक्री करणा-यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा अवैध देशी दारु विक्री करणा-यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा सर्व महिला बचत गटाचवेतीने आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशारा संबंधितांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर चंद्रकला गोविंदा पाटील, रमाबाई प्रल्हाद पाटील, दुर्गाबाई केशव पाटील, लिलाबाई सुधाकर पाटील, कमलाबाई उत्तम भगत, रमाबाई शेषराव पाटील, जिजाबाई रामराव मोरे, निर्मला लक्ष्मण मोरे, मंगला भगवान कदम, मिनाबाई सुरेश काकडे,सुनिता शमराव पाटील, विद्या राजु भगत, चंद्रभागा गजानन पडघान, भाग्यरथी दयाराम पखाले, आरती संजय पडघान, मनकर्णा रमेश पडघान, अनुसया गोविंदा मुळे, पदमाबाई केश्व पाटील, विश्रांतीबाई भास्कर राऊत, आश श्रीधर पाटील, बेबी नामदेव पाटील यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.
याबाबत अनेक वेळा गावातील महिला-पुरुषांकडून विरोध केला गेला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यातही आली. परंतु असे निदर्शनास आले की, पोलिसांच्या आशीर्वादाने ही मंडळी आपली देशी दारु विकण्याची दुकान मोठ्या थाटामाटात चालवितात. ही माणसे अत्यंत गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही बोलण्यास धजत नाही, तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.