जिल्हा परिषद निवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या; यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:56 PM2020-01-06T13:56:16+5:302020-01-06T13:56:20+5:30
५ जानेवारीला सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समितीचे १०४ गणासाठी जिल्ह्यात ८५२ मतदान केंद्रावर ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, ५ जानेवारीला सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समितीचे १०४ गणासाठी ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. जिल्हा परिषद गटासाठी २६७ तर पंचायत समिती गणासाठी ४७३ उमेदवार नशिब आजमावत आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट पथक, व्हिडीओ शुटींग पथक गठीत करण्यात आले असून, ही पथके २४ तास कार्यान्वीत ठेवण्यात आली आहेत. काही पथके राखीव असून, क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या निवडणूकीसाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मतदानासाठी येणा?्या मतदारांसाठी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्सची सुविधा तेथे असावीत. निवडणूकीसाठी आवश्यक तेवढी वाहने अधिग्रहीत करावीत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणा?्या सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना बोलवावे म्हणजे निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस विभागाची चांगल्याप्रकारे मदत होईल असे त्यांनी सांगीतले. उपजिल्हाधिकारी श्री. काळे यांनी निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची यावेळी माहिती दिली.
जिल्हयातील ८५२ मतदान केंद्रावर ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत ३ लाख ५४ हजार ७२० स्त्री मतदार, ३ लाख ९० हजार ८४८ पुरुष आणि ९ तृतियपंथी मतदार असे एकूण ७ लाख ४५ हजार ५७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हयातील ८५२ मतदान केंद्रावर ८५२ मतदान पथके मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. १३५ मतदान पथके ही राखीव असणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ९८७ मतदान केंद्राध्यक्ष, ३१६८ मतदान कर्मचारी आणि ९११ शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८५२ मतदान केंद्र सुस्थितीत असून यामध्ये ८७ आदर्श मतदान केंद्र असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या सार्वत्रिक निवडणूकीत मतदान यंत्रावर मतदान होणार असून यासाठी २२४० बॅलेट युनिट, ११२० कंट्रोल युनिट आणि ११२० मेमरी लागणार आहे.