वाशिम जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची ६४ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:35 PM2019-06-03T13:35:47+5:302019-06-03T13:36:00+5:30
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची २९ आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची २९ आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी राज्याच्या अवर मुख्य सचिवांकडे ३ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामीण भागाचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय आखणी केली आहे. त्यात प्रत्येक यंत्रणेला महत्वाचे स्थान आहे. शासन आणि ग्रामपंचायतीत महत्वाचा दुवा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, आठ पशुधन विकास अधिकारी, दोन गटविकास अधिकारी, दोन सहायक गटविकास अधिकारी, तीन तालुका आरोग्य अधिकारी यासह वर्ग एकचे २९, वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याचा परिणाम कामकाजावर होत असून अनेक विकासात्मक कामे रखडत आहेत तर काही कामांचे ‘रिझल्ट’ अपेक्षेप्रमाणे येत नसल्याचे दिसून येते. विभागप्रमुखांची पदेच रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाच्या गतीला ‘ब्रेक’ लागत आहेत. सध्या वर्ग एक आणि वर्ग दोन दर्जाच्या अधिकाºयांचे बदली सत्र शासनस्तरावर सुरू आहे. त्याअनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदेतील अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सोमवारी अवर मुख्य सचिवांकडे केली.