वाशिम जिल्हा परिषदेत ‘कॅबिनमुक्त’ कार्यालयाचा उपक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:25 PM2017-10-25T14:25:47+5:302017-10-25T14:26:56+5:30

Washim Zilla Parishad launches 'Cabin-Free' office! | वाशिम जिल्हा परिषदेत ‘कॅबिनमुक्त’ कार्यालयाचा उपक्रम !

वाशिम जिल्हा परिषदेत ‘कॅबिनमुक्त’ कार्यालयाचा उपक्रम !

googlenewsNext
ठळक मुद्देसीईओंचा पुढाकार एकाच खोलीत बसण्याची व्यवस्था

वाशिम - कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरीत कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकाºयांच्या कॅबिन हटविल्या जात आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांनी विशेष पुढाकार घेतला, हे विशेष.

‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेत सर्व विभाग प्रमुखांच्या कार्यालयात एकाच खोलीत सर्व कर्मचाºयांच्या टेबल व खुर्चीची व्यवस्था केली जात असून, यापूर्वीच्या कॅबिन हटविण्यात येत आहेत. आता केवळ विभाग प्रमुखालाच कॅबिन राहणार असून, उर्वरीत सर्व अधिकारी व कर्मचारी एका खोलीत दोन्ही बाजूला टेबल, खुर्चीत एका रांगेत बसण्याची व्यवस्था केली जात आहे. या खोलीत दोन सीसी कॅमेरे ठेवले जाणार आहेत. याचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात राहणार आहे. अधिकारी व कर्मचारी काय करीत आहेत, हे विभाग प्रमुखाला थेट पाहता येणार आहे. कार्यालयीन वेळेनंतर येणे, मधातच दांडी मारणे, कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जाणे आदी प्रकारांना यामुळे चाप बसेल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला. 

Web Title: Washim Zilla Parishad launches 'Cabin-Free' office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार