वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरक्षण सोडत कार्यक्रमाने राजकीय हालचालींना वेग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:53 PM2018-07-28T12:53:26+5:302018-07-28T12:55:21+5:30
वाशिम - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते.
वाशिमजिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१३ मध्ये झाली होती. येत्या डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. सन २०१३ मध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यानंतर सन २०१६ मध्ये मालेगाव व मानोरा नगर पंचायत अस्तित्वात आल्याने जिल्हा परिषदेचा मालेगाव मतदारसंघ बाद ठरला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे एकूण ५१ मतदार संघ होते. शुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. त्यानुसार आता जिल्हा परिषदेचे ५२ तर पंचायत समितीचे १०४ मतदारसंघ राहणार आहेत. वाशिम तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला आहे. जिह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणाची प्रभाग रचना करण्यात येणार असून, २७ आगस्ट रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग रचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर होईल.
प्रभाग रचनेच्या कार्यक्रमनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनेचा प्रस्ताव अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या आरक्षणासह जिल्हाधिकायामार्फत १० आगस्टपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येईल. प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास २० आगस्टपर्यंत विभागीय आयुक्ताकडुन मान्यता देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी नागरिकाचा मागस प्रवर्ग, अनु.जाती, अनु. जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासह प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत तर पंचायत समितीसाठी तहसिलदारांमार्फत ही सोडत काढण्यात येणार आहे. ३० आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या दरम्यान जिल्हाधिकाºयांकडे हरकती व सूचना सादर करता येणार आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत विभागीय आयुक्तामार्फत प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्र्रभाग रचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.