वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:27 AM2018-01-29T01:27:19+5:302018-01-29T01:27:51+5:30
वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, सभापती यमुना जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकार्यांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्यांच्या मैदानी तसेच सांघिक स्पर्धा झाल्या. सायंकाळी जिल्हा क्रीडा संकुलावर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी विविध प्रकारचे गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. कबड्डी, खो-खो व अन्य स्पर्धेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय संघांनी सहभाग नोंदविला.
विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या दौर्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धा, तसेच सांस्कृतिक महोत्सव लांबणीवर पडला होता. पंचायत राज समितीच्या दौर्यानंतर आता क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव असल्याने अधिकारी-कर्मचार्यांमध्ये उत्साह दिसून येतो. पहिल्या दिवशी दिवसभर जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, ग्रामसेवक कर्मचारी युनियन, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पशू वैद्यकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कृषी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, लेखासंवर्गीय कर्मचारी संघटना यासह विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ३0 जानेवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ होईल. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा मंडळाचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.