Washim ZP : मिनी मंत्रालयात महाविकास आघाडीचीच सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:20 PM2020-01-14T15:20:02+5:302020-01-14T15:20:07+5:30
आघाडीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे आघाडीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदमध्ये आघाडीला स्पष्ट बहुमत असतांना काही पक्षांकडून सत्ता स्थापनेच्या गप्पा केल्या जात आहेत. हा राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असून त्या केवळ वावडया आहेत. आघाडीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे आघाडीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. या संदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक ही घेण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुक निकालानंतर आता सत्तास्थानेच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तथापि, महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन करणाऱ्या काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेकडे जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी २७ हे संख्याबळ आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणात े माजी खासदार अनंतराव देशमुख हे आपल्या जनविकास आघाडीच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन रा.काँ. (१२) आणि भारिप-बमसंच्या (८) साथीने सत्तास्थापन करणार असल्याच्या वावळया उडविल्या जात आहेत. यासंदर्भात अनंतराव देशमुख यांच्याशी चर्चा केला असताना त्यांनी सूध्दा सत्ता ही आघाडीची बनविल्या जाणार यात शंका नाही, परंतु यासंदर्भात आपल्याला कोणाकडूनही विचारणा झालेली नाही. सत्ता स्थापनेबाबत विचारणा केल्यास आपण उत्सूक नक्कीच असल्याचे सांगितले होते. तरी काही विरोधकांकडून मात्र काँग्रेसला बाजुला ठेवून सत्ता स्थापन के ल्या जाणार असल्याच्या वावडया उडविल्या जात आहे. यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे आघाडीतील नेते, जिल्हाध्यक्षांचे म्हणणे आहे. तसेच आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतीलच उमेदवाराला अध्यक्ष व उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत खा. भावना गवळी, आ. अमित झनक, प्रकाश डहाके, चंद्रकांत ठाकरे, अॅड. दिलीप सरनाईक यांच्या चर्चेवरुन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याचे चिन्हे आहेत.
भाजपाची गोची
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने ७ जागेवर विजय मिळविला असून महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता स्थापनेचा विचार सुध्दा भाजपाच्या नेत्यांना करता येत नसल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेबाबत उडत असलेल्या वावळयांमध्येही भाजपाचे कुठेच नाव सुध्दा निघत नसल्याने भाजप तटस्थ दिसून येत आहे. अपक्षांनाही कोणी विचारत नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद निवडणूका जरी स्वतंत्र लढविण्यात आल्या असल्यातरी जनतेने आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्याने सत्ता आघाडीची स्थापन होणार आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून लवकरच यावर चर्चा करुन सर्वांच्या समन्वयातून आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये दिसून येईल. काही जण विणाकारण वावळया उडवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्याला अपयश येणे नव्हे!
-भावनाताई गवळी,
खासदार, शिवसेना
राज्यात आघाडीची स्थापना आहे. जिल्हा परिषदेमध्ये मतदारांनी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन बहुमतावर पोहचविले, त्यामुळे सत्ता आघाडीचच राहिल यात शंका नाही.
-अॅड. दिलीपराव सरनाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडे सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले २७ चे संख्याबळ आहे. त्यामुळे दुसरे कोणी सत्ता स्थापन करण्याचा दावा करणे म्हणजे स्वत:चा हसा करुन घेणे होय. आम्ही आघाडीतील तीनही पक्ष समन्वय साधून आघाडीचीच सत्ता स्थापन करणार आहोत.
- चंद्रकांत ठाकरे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस