वाशिम जि.प., पं.स. प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:17 PM2019-05-03T13:17:18+5:302019-05-03T13:17:32+5:30

वाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या एकूण ६ पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध केला.

Washim ZP Notification format announcement! | वाशिम जि.प., पं.स. प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर!

वाशिम जि.प., पं.स. प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या एकूण ६ पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध केला. त्यानुसार, ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणासाठीची सोडत काढण्यात येवून ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यावर ६ मे पर्यंत हरकती व सूचना मागविण्यता आल्या आहेत.
पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी २७ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत व ३० एप्रिल २०१९ रोजी काढण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या निर्वाचक विभागाकरिता आरक्षण सोडतीबाबतची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना २ मे २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, काही तांत्रीक कारणांमुळे त्यास एक दिवस विलंब लागला. ३ मे रोजी मात्र ही अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर ६ मे २०१९ पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर ६ मे ते १० मे २०१९ या कालावधीत अमरावती विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: Washim ZP Notification format announcement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.