वाशिम जि.प. पदाधिकाºयांच्या साखरडोह येथे गृहभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:41 PM2017-11-16T13:41:35+5:302017-11-16T13:42:35+5:30

मानोरा : मानोरा तालुका येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने जि.प.वाशिम व पंचायत समितीच्या अधिकारी पदाधिकारी यांनी शौचालय नसलेल्या लोकानाच्या घरी भेटी दिल्या.

Washim zp office bearers gives visits to villagers | वाशिम जि.प. पदाधिकाºयांच्या साखरडोह येथे गृहभेटी

वाशिम जि.प. पदाधिकाºयांच्या साखरडोह येथे गृहभेटी

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छता अभियान

 

मानोरा : मानोरा तालुका येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने जि.प.वाशिम व पंचायत समितीच्या अधिकारी पदाधिकारी यांनी शौचालय नसलेल्या लोकानाच्या घरी भेटी दिल्या. ३१ डिसेंबरपर्यंत मानोरा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व  पंचायत समितीच्या पदाधिकारी यांनी तालुक्यातील साखरडोह गिरडा, गव्हा, वार्डा,खेर्डा, खापरदरी गावाना भेटी देवुन ३१ डिसेंबर पर्यंत शौचालय न बांधल्यास शौचालयाचे बारा हजार रुपये अनुदान मिळणार नाही असल्याची जाणिव करुन देण्यात आली.याशिवाय उघड्यावर शौचालय जाणाºया नागरिकांविरुध्द बाराशे रुपये दंडाची तसेच सहा महिन्याच्या कारावासाची जाणिव करुन देण्यात आली. अधिकारी व पदाधिकारी ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवुन उघड्यावर बसणाºया व शौचालय नसणाºया नागरिकाच्या घरी जावुन भेटी देण्यात आल्या.  यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, वरिष्ठ लेखा अधिकारी साने, मानोरा पं.स.च्या  उपसभापती रजनी गावंडे, पं.स.सदस्य अशोक चव्हाण,  मिनी बिडीओ रणवीर सोनसळे, विस्तार अधिकारी सतिष नायसे,संजय भगत, बि.ए.बेलखेडकर, एम.एल.वाघमारे, श्रीकृ ष्ण चव्हाण, व्यवहारे, जि.प.वाशिमचे  दुधाटे,  प्रफुल काळे,  सर्व ग्रामसेवक शिक्षक ,अंगणवाउी सेविका उपस्थित होते.

Web Title: Washim zp office bearers gives visits to villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.