वाशिम जि.प. कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया लांबणीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 04:18 PM2020-07-28T16:18:44+5:302020-07-28T16:18:55+5:30
सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने २८ जुलै रोजी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हास्तरीय सार्वत्रिक बदली प्रक्रियेचे नियोजित वेळापत्रक रद्द करावे लागले. सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने २८ जुलै रोजी सांगितले.
शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील वर्ग-३ व वर्ग -४ मधील संवर्गाच्या कर्मचाºयांच्या प्रशासकीय आणि विनंतीनुसार सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने करावयाची आहे. जिल्हास्तरीय बदली प्रक्रियेचे वेळापत्रक यापूर्वी जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हास्तरावरील सर्व विभागाच्या प्रशासकीय, विनंती, आपसी बदल्या समुपदेशन पद्धतीने ३० जुलै रोजी होणार होत्या. परंतू, जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार आहे. तुर्तास कर्मचाºयांना सुधारीत वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे.
सर्वांसाठी समान नियम असावा
जिल्हा परिषदेत काही विभागात एकाच टेबलवर काही कर्मचारी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत तर काही कर्मचाºयांचे टेबल केव्हाही बदलले जातात. मध्यंतरी दोन, तीन कर्मचाºयांचे टेबल बदलण्यात आले; परंतू अल्पावधितच त्याच कर्मचाºयांकडे परत ते टेबल देण्यात आल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहे. बदली प्रक्रियेत सर्वांसाठी समान नियम असावा, अशी सर्वसामान्य कर्मचाºयांची अपेक्षा आहे.