वाशिमकरांना आवडतो ९९९ नंबर; फॅन्सी नंबरसाठी मोजतात लाखो रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:34+5:302021-06-29T04:27:34+5:30

महागडे वाहन खरेदी करण्यासोबतच त्यावरील क्रमांकही मनपसंद असावा, याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे. त्यातूनच दुचाकी, चारचाकी वाहनांवर काही विशिष्ट ...

Washimkar's favorite number is 999; Millions of rupees are counted for fancy numbers! | वाशिमकरांना आवडतो ९९९ नंबर; फॅन्सी नंबरसाठी मोजतात लाखो रुपये!

वाशिमकरांना आवडतो ९९९ नंबर; फॅन्सी नंबरसाठी मोजतात लाखो रुपये!

Next

महागडे वाहन खरेदी करण्यासोबतच त्यावरील क्रमांकही मनपसंद असावा, याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे. त्यातूनच दुचाकी, चारचाकी वाहनांवर काही विशिष्ट क्रमांकाची मागणी होऊ लागली. ग्राहकांची पसंती पाहून परिवहन विभागाने व्हीआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे क्रमांक आरक्षित करून त्याची ‘किंमत’ जाहीर केली आहे. जिल्ह्यात २०१९ मध्ये ४२१ फॅन्सी वाहन क्रमांकाच्या विक्रीतून ३१ लाखांचा; तर २०२० मध्ये २२० क्रमांकांच्या विक्रीतून १६ लाखांचा महसूल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास प्राप्त झाला. यंदाही आतापर्यंत सुमारे ६ लाख रुपये यामाध्यमातून मिळाले.

.................

कोट :

१, १०१, ५५५, ९९९ या क्रमांकांना वाहनचालकांकडून विशेष पसंती दिली जाते. त्यामुळे या क्रमांकांचे दर सर्वाधिक आहेत. १ या क्रमांकासाठी तीन लाख रुपये मोजावे लागतात; तर नमूद इतर क्रमांकांसाठी प्रत्येकी ७० हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. विशिष्ट व्हीआयपी क्रमांकांची आवड असणाऱ्यांकडून मागणी आल्यानुसार क्रमांक उपलब्ध करून दिला जातो.

- ज्ञानेश्वर हिरडे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

....................

...तर नंबरसाठी होतो लिलाव

दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांकडून एकाच विशिष्ट नंबरसाठी अनेक अर्ज आले तर त्यासाठी लिलाव देखील केला जातो.

वाशिममध्ये विशिष्ट क्रमांकाची मागणी करणाऱ्यांचे प्रमाण तसे कमी असल्याने वर्षभरातून एक ते दोनवेळा असा प्रसंग ओढवतो.

...................

कोरोनाकाळातही हौसेला मोल नाही

२०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे संकट नव्हते. त्यावर्षी फॅन्सी नंबर प्लेटमधून आरटीओला ३१ लाखांचा महसूल मिळाला.

२०२० मध्ये मार्च, एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे संकट ओढवले. असे असतानाही फॅन्सी नंबरप्लेटमधून आरटीओला १६ लाख ८९ हजारांचा महसूल मिळाला.

चालूवर्षीही फॅन्सी क्रमांकाची क्रेझ कायम असून आरटीओला जवळपास सहा लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.

.................

या तीन नंबर्सना सर्वाधिक मागणी

९९९ - चार लाख रूपये

९९९९ - चार लाख रूपये

९४९४ - चार लाख रूपये

..................

२) या नंबरचा रेट सर्वात जास्त

१ - तीन लाख रुपये

१०१ - ७० हजार रुपये

९९९ - ७० हजार रुपये

................

३) आरटीओची कमाई

२०१९ - ३१ लाख

२०२० - १६ लाख

२०२१ (मेपर्यंत) - ६ लाख

Web Title: Washimkar's favorite number is 999; Millions of rupees are counted for fancy numbers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.