जून्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनेचा लढा : नागपूरच्या मोर्चात वाशिमकरांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:08 PM2017-12-19T16:08:04+5:302017-12-19T16:11:49+5:30
वाशिम - नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने लढा उभारला असून, नागपूर येथे १८ डिसेंबर महाआक्रोश मुंडन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले.
वाशिम - नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने लढा उभारला असून, नागपूर येथे १८ डिसेंबर महाआक्रोश मुंडन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले होते तसेच यापुढेही लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेचे वाशिम येथील पदाधिकारी हरिष चौधरी यांनी मंगळवारी सांगितले.
१९८२-८४ ची जुनी पेंशन योजना आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन कर्मचाºयांना नवीन पेन्शन योजनेतून कायमस्वरुपी सवलती मिळणार नाहीत. हा एकप्रकारे कर्मचाºयांवर अन्याय असून, जूनी पेन्शन योजना लागू करणे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी भव्य महाआक्रोश मुंडन मोर्चा काढला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातूनही कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपला आक्रोश शासनापर्यत पोहचविण्यासाठी जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंडनही केले. या नवीन पेंशन योजनेत मयत झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबियांना शासनाकडून कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जुनी पेंशन हक्क संघटना पुर्ण ताकदीनीशी या आंदोलनात उतरली होती. यापुढेही हा लढा तिव्र केला जाईल, असा निर्धार संघटनेच्या पदाधिकाºयांनी केला. विधीमंडळातील बहुतांश आमदार जुनी पेंशन योजना लागु करण्याचे आश्वासन देतात पण सभागृहात प्रभावीपणे मुद्दा का मांडला जात नाही? पाच वषार्साठी निवडुन आलेले लोकप्रतिनिधी आयुष्यभर पेंशन घेतात, तर आयुष्यभर सेवा करणाºया कर्मचाºयांना किती पेंशन मिळणार ? याचं उत्तर शासनाकडून घेण्याचा प्रयत्न या आंदोलनातून केला जात आहे, असे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. नागपूर येथील आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे, विनोद काळबांडे, गोपाल लोखंडे, निलेश कानडे, अनिल मडके, रामप्रसाद धनुडे, शंकर गोविंदकर, किशोर कांबळे, हरिश चौधरी, श्रीकांत बोरचाटे, गजाजन ढोबळे, सुनील वानखेडे, बालाजी फताटे, गणेश महाले, गोविंद पोतदार, नीलेश मिसाळ, मिलींद इंगळे, सतीष शिंद यासह संघटनेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.