वीकेंड निर्बंधाला वाशिमकरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:27+5:302021-07-18T04:29:27+5:30

नवीन नियमावलीनुुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. ...

Washimkar's response to weekend restrictions | वीकेंड निर्बंधाला वाशिमकरांचा प्रतिसाद

वीकेंड निर्बंधाला वाशिमकरांचा प्रतिसाद

Next

नवीन नियमावलीनुुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील व इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, शिवभोजन थाळी केंद्रे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने डाईन इन सुविधेसह सुरू राहतील. तसेच शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार वीकेंड निर्बंधाला १७ जुलैरोजी वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. १८ जुलैरोजीदेखील अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

Web Title: Washimkar's response to weekend restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.