वीकेंड निर्बंधाला वाशिमकरांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:39+5:302021-07-19T04:25:39+5:30
नवीन नियमावलीनुुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. ...
नवीन नियमावलीनुुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील व इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, शिवभोजन थाळी केंद्रे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने डाइन इन सुविधेसह सुरू राहतील. तसेच शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार वीकेंड निर्बंधाला १८ जुलै रोजी वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील काही हाॅटेल्स, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेही रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले.