वाशिमकर ‘योग’मय;आबालवृद्धांचा सहभाग
By admin | Published: June 22, 2015 02:03 AM2015-06-22T02:03:06+5:302015-06-22T02:03:06+5:30
प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिन: २00 माध्यमिक शाळांमध्ये आयोजन.
वाशिम : आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनसह विविध सामाजिक संघटना, समित्यंनी पुढाकार घेतल्याने योग कार्यक्रमास जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हय़ात २0 हजारांच्यावर नागरिकांनी योग दिन कार्यक्रमास उपस्थिती दर्शविल्याची माहिती योग समिती संयोजक जोशी यांनी दिली. तसेच जिल्हय़ातील २८६ माध्यमिक शाळांपैकी २00 शाळांमध्ये योग दिनास शिक्षक, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. योग दिनामध्ये शाळा-महाविद्यालयांचा सहभाग ठेवून विद्यार्थ्यांंना योगाचे महत्त्व कळावे यासाठी शिक्षण विभागानेही जिल्हय़ातील शाळांना पाठविलेल्या पत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हय़ातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांंची उपस्थिती कमी असली तरी २८६ पैकी २00 शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हय़ातील ७७४ प्राथमिक शाळांपैकी अनेक शाळांमध्ये योग कार्यक्रमाचे नियोजन शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले होते; मात्र पावसामुळे यामध्ये व्यत्यय आल्याने बर्याच ठिकाणी नियोजन हुकले. तरी बहुतांश शाळांमध्ये योग दिनास शिक्षकांची आवर्जुन उपस्थिती लाभली होती. जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव व मंगरुळपीर शहराच्या ठिकाणी योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मानोरा तालुक्यात संमिङ्म्र प्रतिसाद आढळून आला. वाशिम येथील वाटाणे मंगल कार्यालयात आयोजित योगदिन कार्यक्रमास तीन हजाराच्या जवळपास नागरिकांनी, अधिकार्यांनी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.