वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी परतणार मूळ शिक्षक पदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:22 PM2019-01-09T15:22:06+5:302019-01-09T15:22:10+5:30
वाशिम : साधारणत: फेब्रुवारी २०१८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर रुजू झालेले डी.ए. तुमराम यांनी परत मूळ पदावर (माध्यमिक शिक्षक) जाण्याकरीता केलेला अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईच्या औरंगाबाद खंडपिठाने मंजूर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : साधारणत: फेब्रुवारी २०१८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर रुजू झालेले डी.ए. तुमराम यांनी परत मूळ पदावर (माध्यमिक शिक्षक) जाण्याकरीता केलेला अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईच्या औरंगाबाद खंडपिठाने मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने तुमराम यांना शिक्षणाधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याला शालेय शिक्षण विभागाने ७ जानेवारी रोजी मान्यता दिली आहे.
एकिकडे पदोन्नतीने कार्यकारी पद मिळविण्यासाठी चढाओढ असताना, काही अधिकारी मात्र कार्यकारी पदाऐवजी मूळ पदावरच समाधान मानतात. मूळ पदावरच समाधान मानणाºया अधिकाºयांच्या रांगेत तुमराम असून, वाशिम येथे शिक्षणाधिकारी पदावर रूजू होण्यापूर्वी ते आदिवासी विकास विभागांतर्गत येणाºया शाळेवर माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते. कौटुंबिक कारण तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रममान असलेले तुमराम यांना शिक्षणाधिकारी पदात फारशी रूची वाटलीच नाही. या कारणास्तव त्यांनी परत माध्यमिक शिक्षक या मूळ पदावर जाण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने १६ आॅगस्ट २०१८ रोजीच्या आदेशानुसार आदिवासी विकास अमरावतीचे अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून तुमराम यांना रूजू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अप्पर आयुक्तांनी ५ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा झटाळा ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे इतर विषयाच्या माध्यमिक शिक्षकाच्या रिक्त जागेवर तुमराम यांना पदस्थापना दिली. आश्रम शाळेवर माध्यमिक शिक्षक म्हणून रूजू होण्यासाठी तुमराम यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावरून कार्यमुक्त करण्यास शालेय शिक्षण विभागाने ७ जानेवारी रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार आता तुमराम हे परत माध्यमिक शिक्षक या मूळ पदावर जाणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात डी.ए. तुमराम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.