वाशिमच्या ‘सदानंद’ची नर्मदा नदी परिसरात स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 03:29 PM2020-01-19T15:29:06+5:302020-01-19T15:29:15+5:30
गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरातील सदानंद गजानन तायडे हा युवकाने स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलवारी गत रविवार १० जानेवारीपासून सुरु केली. सदानंद आठ दिवसात सायकलने प्रवास करीत रस्त्यात लागणाऱ्या गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवित जनजागृती केली. सद्यस्थितीत तो मध्यप्रदेशातील हुशंगाबाद येथील नर्मदानदी परिसरातील स्वच्छता अभियान राबवून परिसरातील गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करीत आहे.
शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे देणाºया या ध्येयवेडा या युवकाने चक्क आता गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे. यापूर्वीही स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर यात्रेदरम्यान तेथे जावून स्वच्छता करुन जनजागृती केली होती.
रॅलीदरम्यान सदानंद ज्या गावात मुक्काम करीत आहे, त्या गावाची संपूर्ण आधी स्वच्छता करुन त्यानंतर गावात अन्न व ग्रामपंचायत, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपले मुक्काम करुन जनगागृती करीत आहे.
पृथ्वीची कर्करेषा परिसराचीही केली स्वच्छता
नर्मदानदी परिसरातील स्वच्छता केल्यानंतर मध्यप्रदेशामध्येच असलेल्या पृथ्वीची कर्करेषा परिसरातील स्वच्छता सदानंद तायडे यांच्याकडून करण्यात आली. येथे आलेल्या पर्यटकांना स्वच्छतेबाबत जनजागृती करीत स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले..