परिट समाजाच्या वतीने १७ डिसेंबरला ‘कपडे धुणे’ आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:50 PM2018-12-15T12:50:28+5:302018-12-15T12:51:03+5:30
वाशिम : संविधानात दिलेल्या तरतुदीप्रमाणे धोबी (परिट) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या सोमवार, १७ डिसेंबरला वाशिममध्ये कपडे धुणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संविधानात दिलेल्या तरतुदीप्रमाणे धोबी (परिट) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या सोमवार, १७ डिसेंबरला वाशिममध्ये कपडे धुणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष राजु धोंगडे, जिल्हाध्यक्ष अॅड. विजय आकोटकर यांनी केले आहे.
गेल्या ४० वर्षांपासून परिट (धोबी) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी शासन दरबारी आंदोलने सुरु आहेत. स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रात धोबी समाज हा अनुसुचित जाती प्रवर्गात होता. मात्र, या समाजाला स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकण्यात आले. धोबी समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी परिट (धोबी) समाजाच्या वतीने १७ डिसेंबर रोजी कपडे धुणे आंदोलन करुन या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हयातील परिट (धोबी) समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अनिल मस्के, मुकुंद मस्के, संदीप भातुरकर, चंद्रशेखर राऊत, प्रभाकर शिंदे, श्रीराम दरणे, अरुण धोंगडे, नारायण घोलप, पुरुषोत्तम धोंगडे, शहर अध्यक्ष गजानन धोंगडे, किशोर धोंगडे, उत्तमराव मोकळे, तानाजी मुधळे, शिवाजी नांदनकर, गजानन भातुरकर, गजानन नागरेपल्लु, राजु कोंढाणे, राजु राऊत रिसोड, सतिश गवळी, गजानन लासकर, सुर्यकांत ठाकरे, शाम राऊत, संजय राऊत, रामकृष्ण राऊत आदिंनी केले.