वाशिमच्या 'रॉदिनर्स ग्रुप'चा थरार; दोनशे किलोमीटर अंतर कापले ११ तासांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:30 PM2017-11-28T14:30:31+5:302017-11-28T14:31:27+5:30
वाशिम रॉदिनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित सायकलस्वारांच्या ब्रेवेट स्पर्धेत २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत वाशिम-कामरगाव-वाशिम हे २०० किलोमीटर अंतर अवघ्या ११ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
वाशिम ते कामरगाव 'ब्रेवेट स्पर्धा'
स्पर्धेत २७ स्पर्धकांनी नोंदविला सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वाशिम रॉदिनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित सायकलस्वारांच्या ब्रेवेट स्पर्धेत २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत वाशिम-कामरगाव-वाशिम हे २०० किलोमीटर अंतर अवघ्या ११ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
वाशिम शहरातील पाटणी चौक येथून या ब्रेवेट स्पर्धेला सकाळी ६ वाजता सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत छाया मडके, अलका गि-हे व रेखा रावले या तीन महिलांसह अकोला, येलदरी व वाशिम येथील एकूण २७ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर मालेगाव, शेलु मार्गे कामरगाव व पुन्हा कामरगाव, शेलु, मालेगाव व वाशिम असे २०० किमीचे अंतर स्पर्धकांनी १३.३० तास या निर्धारित वेळेपेक्षा २.३० तास कमी अर्थात ११ तासांच्या आत सायकलने कापून विक्रम प्रस्थापित केला. यातील रेखा रावले या सायकलस्वाराने वाशिम ते जम्मू या सायकल स्पर्धेत भाग घेतला होता. जगात प्रसिध्द असलेली व सायकलस्वारांना वेड लाणा-या ब्रेवेट स्पर्धेची सुरुवात वाशिम येथे आयोजित करण्याचे श्रेय वाशिम सायकलस्वार ग्रुपचे अध्यक्ष नाारायण व्यास व त्यांच्या सहका-यांना जाते. या सायकल स्पर्धेत स्पर्धकांनी सायकल चालविण्याचा थरार अनुभवला. पुढील डिसेंबर महिन्यात वाशिम येथे होणाºया ३०० किलोमीटर अंतराची ब्रेवेट स्पर्धा आयोजित करण्याचे वाशिम सायकल स्वार ग्रुपने ठरविले आहे. या ब्रेवेट स्पर्धेत सायकलस्वारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन वाशीम सायकलस्वार ग्रुपचे नारायण व्यास यांनी केले. दरम्यान, वाशिम सायकलस्वार ग्रुपच्यावतीने दरवर्षी विविध टप्प्यांच्या सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांना तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक सायकलस्वारांचा उत्स्फूर्त सहभागही लाभत असतो. ही परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार सायकल स्वार ग्रुपने केला आहे.