मालेगाव : व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:08 PM2020-03-30T15:08:18+5:302020-03-30T15:08:43+5:30
मालेगाव तालुक्यातील बोराळा धरणावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील ढोरखेडामार्गे रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाºया व्हॉल्वमधून गत १० दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत असून, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.
मालेगाव तालुक्यातील बोराळा धरणावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा केला जातो. ढोरखेडा, पार्डी मार्गे रिसोड अशी पाईपलाईन करण्यात आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर होत आहे तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत असतानाही याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रिसोडला पाणीपुरवठा करणाºया या योजनेंतर्गत ढोरखेडा ते पार्डी या गावात जवळपास ६ व्हॉल्व असून, या सर्व व्हॉल्वमधून सद्यस्थितीत पाण्याचा अपव्यय होत आहे. भरपूर प्रमाणात पाणी वाया जात असल्याने व्हॉल्वच्या ठिकाणी दुर्गंधीचें साम्राज्य निर्माण झाले. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.