अडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:14+5:302021-06-22T04:27:14+5:30

----------- वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान वाशिम : उंबर्डा बाजार परिसरात सध्या पिके अंकुरली असून, हरीण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ ...

Waste of water from Adol project | अडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय

अडोळ प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय

googlenewsNext

-----------

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

वाशिम : उंबर्डा बाजार परिसरात सध्या पिके अंकुरली असून, हरीण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे १८ जून रोजी दिसून आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.

----------

खरीप पेरणीत शेतकरी व्यस्त

वाशिम : सध्या पावसाने चार दिवसांपासून उसंत घेतल्याने शेतजमीन पेरणीसाठी योग्य झाली आहे. त्यामुळे खरीप पेरणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे १५ ते १८ जून दरम्यान दिसून आले. प्रामुख्याने सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांचा अधिक भर आहे.

-----------

जामदरा प्रकल्पावर वाढली झुडपे

वाशिम : मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील प्रकल्पाची दुरुस्ती प्रलंबित असतानाच या प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठे वृक्ष वाढले असून मुळे खोलवर जाऊन प्रकल्पाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. त्याची दखल घेऊन झुडपे तोडण्यासह प्रकल्पाची तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी या प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी करीत आहेत.

Web Title: Waste of water from Adol project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.