व्हॉल्वामधून पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:57+5:302021-06-26T04:27:57+5:30
--------------- वन्यप्राण्यांचा कोवळ्या पिकांवर ताव वाशिम : कामरगाव परिसरात सध्या कोवळी खरीप पिके डोलदार असून, हरीण, माकड आदी वन्यप्राणी ...
---------------
वन्यप्राण्यांचा कोवळ्या पिकांवर ताव
वाशिम : कामरगाव परिसरात सध्या कोवळी खरीप पिके डोलदार असून, हरीण, माकड आदी वन्यप्राणी पिकात धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे ११ जुलै रोजी दिसून आले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.
---------
दगड उमऱ्यात पेरणीला वेग
वाशिम : जवळपास सहा दिवस दडी मारणाऱ्या पावसाने गुरुवारी वाशिम तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे सुकत चाललेल्या पिकांना आधार भेटलाच शिवाय ज्या शेतकऱ्यांची पेरणी लावली होती. त्या शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे.
------------
सोनल धरणावर वाढली झुडपे
वाशिम : मालेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या सोनल प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. ही झाडे तोडण्याची मागणी होत आहे.
-----------