वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !
By admin | Published: July 16, 2017 08:24 PM2017-07-16T20:24:44+5:302017-07-16T20:24:44+5:30
वाशिम : गत १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात मनसोक्त बरसला. यामुळे खरिप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात मनसोक्त बरसला. यामुळे खरिप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके संकटात सापडली होती. यामुळे काही ठिकाणी दुबार; तर कुठे तिबार पेरणीही करावी लागली. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. १५ जुलै रोजी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला. दरम्यान, १६ जुलै रोजी सकाळपासूनच जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस सुरू आहे. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.
१६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३.४० मीमी पाऊस झाला. वाशिम तालुक्यात ३०.४० मीमी, मालेगाव तालुक्यात १७ मीमी, रिसोड तालुक्यात ४५ मीमी, मंगरूळपीर तालुक्यात १३ मीमी, मानोरा तालुक्यात २२ मीमी तर कारंजा तालुक्यात १३ मीमी पाऊस पडल्याची नोंद आहे.