पीक कर्ज वितरणावर ‘वॉच’
By Admin | Published: June 24, 2016 12:02 AM2016-06-24T00:02:54+5:302016-06-24T00:02:54+5:30
जिल्हा उपनिबंधक व अग्रणी बँकेचा पुढाकाराने शेतक-यांपर्यंंत पीक कर्ज पोहचते करण्यासाठी ‘अँक्शन प्लॅन’.
वाशिम:२0१६-१७ या वर्षात पीक कर्ज घेताना शेतकर्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वाशिम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला आहे. खरीप पीक कर्जाचा लाभ घेताना किंवा कर्ज पुनर्गठन करताना कोणतीही अडचण आल्यास शेतकर्यांना तालुका उपनिबंधक कार्यालय व प्रमुखांच्या मोबाइल क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे.
शासनामार्फत केल्या जात असलेल्या सोप्या पीक कर्ज वितरणाच्या प्रयत्नांना काही बँकांचे प्रशासन फारसा प्रतिसाद देत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज घेताना शेतकर्यांना येणार्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा अग्रणी बँकेने ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला आहे. २0१६-१७ च्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी पीक कजार्पासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून, जून अखेरपर्यंंत पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या जिल्ह्यात ७८ टक्के पीक कर्जाचे वितरण झाले आहे.
पीक कर्ज, पुनर्गठन किंवा रूपांतरणाविषयी कोणतीही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जी.बी. राठोड व एम.जे. भेंडेकर, वाशिम सहायक निबंधक कार्यालयात बी.ए. कोल्हे, रिसोड सहायक निबंधक कार्यालयात आर.आर. सावंत, मालेगाव सहायक निबंधक कार्यालयात पी.टी. सरकटे, मंगरुळपीर सहायक निबंधक कार्यालयात पी.एन. गुल्हाने, कारंजा कार्यालयात डी.डी. दारमोडे, मानोरा सहायक निबंधक कार्यालयात आर.बी. राठोड यांचे मोबाइल क्रमांक शेतकर्यांसाठी ह्यपीक कर्ज : तक्रार निवारण केंद्रह्ण म्हणून घोषित केले आहेत. शेतकर्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तातडीने निराकरण केले जाणार आहे. खासगी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक व राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित पीक कर्ज व पुनर्गठनाबाबत शेतकर्यांना जिल्हा अग्रणी बँक किंवा संपर्क अधिकारी इंगोले यांच्याशी संपर्क करावा, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली.