‘ध्वनी प्रदूषणा’वर पथकाचा ‘वॉच’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:10 PM2017-09-29T20:10:04+5:302017-09-29T20:11:47+5:30

वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकाºयांची नियुक्ती केली असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी व समितीला द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी केले.

Watch 'watch' on 'Sound Pollution'! | ‘ध्वनी प्रदूषणा’वर पथकाचा ‘वॉच’ !

‘ध्वनी प्रदूषणा’वर पथकाचा ‘वॉच’ !

Next
ठळक मुद्देपोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिका-यांची नियुक्ती जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकाºयांची नियुक्ती केली असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी व समितीला द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी केले.
विविध प्रकारे ध्वनी प्रदुषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ध्वनी प्रदुषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून नियंत्रण प्राधिकारी तसेच सनियंत्रण समिती स्थापन केली आहे.ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियांका मीना, वाशिम शहराचे ठाणेदार विजय पाटकर, वाशिम ग्रामीणचे ठाणेदार सुनील अंबुलकर, रिसोडचे ठाणेदार राजेंद्र पाटील, मालेगावचे ठाणेदार एस. एच. नाईकनवरे, शिरपूरचे ठाणेदार हरीष गवळी, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, मंगरूळपीरचे ठाणेदार आर. बी. जायभाये, अनसिंगचे ठाणेदार गणेश भाले, आसेगावचे ठाणेदार विनायक जाधव, जऊळकाचे ठाणेदार आर. जी. शेख, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कारंजा शहरचे ठाणेदार एम. एम. बोडखे, कारंजा ग्रामीणचे ठाणेदार गजानन गुल्हाणे, मानोराचे ठाणेदार आर. एन. मळगणे, धनजचे ठाणेदार शिशिर मानकर या पोलीस अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. 
जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे असून गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक के. एच. धात्रक हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक १०० या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देता येणार आहे. ध्वनी प्रदुषण होत असल्यास नागरिकांनी उपरोक्त संपर्क क्रमांक तसेच अधिकाºयांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

Web Title: Watch 'watch' on 'Sound Pollution'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.