श्रमदानातून साकारली जलसमृध्दी ; २० गावातील ग्रामस्थांचे श्रम लाभले सार्थकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:55 PM2018-06-13T13:55:01+5:302018-06-13T13:55:01+5:30
मंगरुळपीर : पाणी फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील सहभागी गावात राबविण्यात आली.
- नाना देवळे ।
मंगरुळपीर : पाणी फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील सहभागी गावात राबविण्यात आली. दुष्काळाच्या स्पर्धेदरम्यान गावक-यांना श्रमदानातून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करत ४५ दिवसात तापत्या उन्हात जलसंधारणाची कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली. या कामातून २० गावातील ग्रामस्थांचे श्रमदानातून जलसमृध्दी साकारली असून त्यांचे श्रम सार्थकी लाभल्याचे नुकत्याच झालेल्या पावसावरुन दिसून येते. साचलेल्या पाण्याजवळ श्रमदान करणारे ग्रामस्थ सेल्फी काढून आनंद व्यक्त करीत आहेत.
गत तीन ते चार दिवसांपासून जिल्हयात पावसाने चांगलीच हजेरी लावली. मंगरूळपीर तालुक्यातील २५ गावात श्रमदान व यत्रांच्या सहायाने जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात झाली. पावसाचे पाणी जमिनिवर पडल्यानंतर वाहून जाते. परीणामी गावकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. धावणाºया पाण्याला चालायला शिकवणे व चालणाºया पाण्याला थांबायला शिकविणे व थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिकविणे. या पाणी फांउडेशनच्या सुत्रानुसार मंगरूळपीर तालुकयातील ५९ गावकºयांनी सत्यमेव जयते वॉटर कपचे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यापैकी लखमापुर, बोरवा, सायखेडा, शेदुरजना, वनोजा, पिंपळखुटा संगम, धोत्रा, गणेशपुर, म्हसोला, लाठी, तपोवन, वनोजा, कोठारी, घोटा, माळशेलु, नागी, ईचा, शेलगाव, जांब, मोहरी या २० गावाला जलंसंधारणाची कामे यत्रांच्या व श्रमदानाच्या माध्यमातून झाली. स्पर्धेदरम्यान गावकºयांनी ४५ दिवस श्रमदान करून आपल्या गावात सि.सि.टी, डिप.सि.सिटी, नाला खोलीकरण, शेततळे ,गॉबीयन बंधारा, एल.बी.एस आदी जलसंधारणाची कामे केली. गावकºयांनी श्रमशक्ती वापरून गावात पाणी साठा निर्माण करण्यासाठी जी जलपात्रे तयार केलीत. त्यात फक्त वाट होती पावसाची, पावसाने गेल्या दोन दिवसापासून जोरदार हजेरी लावली. श्रमातून तयार केलेल्या पात्रामध्ये मोठया प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला. गावातील पाणी वाहुन गेले नाही. हे गावात साचलेले पाणी पाहुन गावकरी आनंद व्यक्त करीत आहे. त्या पाण्यासोबत सेल्फी काढून श्रमाचे पाणी त्यांच्या दिसत आहे.