मंगरूळपीर तालुक्यात जलसंधारणाच्या कामांसंदर्भात शिवारफेरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:52 PM2018-09-26T14:52:21+5:302018-09-26T14:53:13+5:30

मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील जांब, पिंप्री बु.,खरबी, मोझरी येथे अधिकारी व गावकºयांच्या उपस्थितीत शिवारफेरी काढण्यात आली.

water conservation work awairness rally in Mangarulpir taluka | मंगरूळपीर तालुक्यात जलसंधारणाच्या कामांसंदर्भात शिवारफेरी !

मंगरूळपीर तालुक्यात जलसंधारणाच्या कामांसंदर्भात शिवारफेरी !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील जांब, पिंप्री बु.,खरबी, मोझरी येथे अधिकारी व गावकºयांच्या उपस्थितीत शिवारफेरी काढण्यात आली.
राज्य सरकार व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होणार आहेत. त्या दृष्टीने पाणलोट उपचाराची कामे कोणत्या जागेत करायची या संदर्भात शिवारफेरी काढुन जागेची पाहणी केली जात आहे. परिसरात शेततळे, डीप सीसीटी, सिमेंट बंधारा खोलीकरण, नाला खोलीकरण, गॅबीयन बंधारा आदि कामे केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यात शिवारफेरी काढून जनजागृती केली जात आहे. जांब येथील फेरीमध्ये सरपंच साहेबराव भगत, ग्राम सचिव राजेश ठाकरे, कृषी सहाय्यक अमोल हिसेकर, पोलिस पाटील मधुकर अव्हाळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महादेव भरदुक, युवराज अव्हाळे आदी उपस्थित होते.
तसेच पिंप्री बु. ग्रा.पं.अंतर्गत येणाºया खरबी, मोझरी येथेही शिवार फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये सरपंच बाळासाहेब ठाकरे, उपसरपंच साहेबराव खिराडे, सचिव सिमा सुर्वे, तलाठी चित्तमपल्ली, कृषी सहाय्यक सांगोळे, यासह तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील ग्रा.पं.सदस्यासह पिंप्री, खरबी व मोझरी येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी अडाण नदीवर जावुन पाहणी करण्यात आली. नदीपात्रात खोलीकरण व रुंदीकरण कसे करावे या संदर्भात चर्चा करण्यात आली. मोझरी येथील ई क्लास जमीनीवर जावुन शेततळ्याबाबत पाहणी करण्यात आली. मोझरी येथील नदीवर खोलीकरण, रुंदीकरण करण्यासंदर्भात गावकºयांसोबत यावेळी चर्चा करण्यात आली. या शिवार फेरीमध्ये रमेश कांबळे, सिध्दार्थ सोनोने, चंदन कांबळे, गौतम सोनोने, गजानन ठाकरे, नारायण ठाकरे, गोविंदा खाडे, पंजाब कांबळे, रवि राठोड, बंडु राठोड, राज राठोड, यांचेसह प्रिंपी बु. येथील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: water conservation work awairness rally in Mangarulpir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.