१५0 गावांमध्ये होणार जलसंधारणाची कामे!

By admin | Published: November 8, 2016 02:10 AM2016-11-08T02:10:04+5:302016-11-08T02:10:04+5:30

९७ लाख रुपयांचा निधी; सिंचनाची होणार शाश्‍वत सोय

Water conservation works to be done in 150 villages | १५0 गावांमध्ये होणार जलसंधारणाची कामे!

१५0 गावांमध्ये होणार जलसंधारणाची कामे!

Next

वाशिम, दि. ७- ग्रामीण भागातील जल, भूमी व इतर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान राबविले जात आहे. त्यात जिल्ह्यातील १५0 गावांचा समावेश असून, या गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जिल्ह्याला ९७ लक्ष रुपये मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात १ मे २00२ पासून महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान राबविण्यात येते. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने जलयुक्त शिवार अभियान सुरू असतानाही अभियानास २0१९-२0 पर्यंंंत वाढीव मुदत देण्यात आली.
पर्जन्याधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, पाणी व मातीचे संवर्धन करणे, रोजगार उपलब्धतेत वाढ करणे आणि पर्यायाने कृषी उत्पादनात वाढ करून भूसंपत्तीमध्ये स्थायी स्वरुपाची सुधारणा करणे, हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या लोकसहभागातून हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत जलस्रोत संवर्धनासाठी पारंपरिक नाला बंडीग, गॅबियन बंधारे, विहीर पुनर्भरण, वनराई बंधारे, मागील २५ वर्षांंत विविध योजनेत निर्माण गावतलाव, पारंपरिक शिवकालीन व ब्रिटिशकालीन तलावांतील गाळ काढणे, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण करणे आदी कामे केली जात आहेत. अभियानाच्या माध्यमातून २0१६-१७ या आर्थिक वर्षांंंत केल्या जाणार्‍या कामांकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ९७ लाख रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या अंतर्गत होणार्‍या कामांची गती यामुळे वाढणार आहे.

Web Title: Water conservation works to be done in 150 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.