कारंजात खोलीकरणातून नाल्यांचा संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:18 PM2019-02-19T13:18:24+5:302019-02-19T13:19:07+5:30
कारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत कारंजा तालुक्यातील पानविहीर येथे लघू पाटबंधारे विभागाने दोन नाल्यांचे खोलीकरण करताना त्यांचा सुरेख संगम केला आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे.
राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून राज्यभरात सुजलाम, सुफलाम अभियान राबवून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात ४९ शेततळी, नदी खोलीकरण, नाला खोलीकरण, सीसीटी, डीप सीसीटी, ढाळीच्या बांधासह जलसंधारणाची इतर अनेक कामे केली जात आहेत. महसून विभाग, कृषी विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, वनविभाग आणि लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत आहेत. याच अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील पानविहीर येथे बुजलेल्या दोन नाल्यांचे खोलीकरण लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या दिशेतून येणाºया या नाल्यांचे खोदकाम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आणि हे दोन्ही नाले तिसºया नाल्यास जोडण्यात आल्याने या नाल्यांचा संगमच झाला आहे. याकरिता शाखा अभियंता अब्दुल सईद हे सहकार्य करत आहे या कामांमुळे पानविहीर येथील पाणी पातळी वाढण्यासह नाल्यातील पाण्याचा लाभ शेतकºयांना होणार आहे.